राजकारण

भाजप नेते मधुकर पिचड अडचणीत; मुलगा-सुनेचा छळ केल्याचा आरोप

नाशिक : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम ४९८, ३०६, ४०६, ३२४, ५०४, ५०६, ४६८, ४७१ अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस मधुकर पिचड यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button