Top Newsराजकारण

‘बिगडे नवाब…; जावई अन् काळी कमाई वाचवायची आहे! अमृता फडणवीसांचा मलिकांवर संताप

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला आहे. तसेच यांना आपला जावई आणि काळी कमाई वाचवायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, अलीकडेच नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमृता फडणवीस यांच्यासोबत ड्रग स्मगलरचा फोटो शेअर केला होता. एवढेच नाही, तर या फोटोसोबत नवाब मलिक यांनी, आज भाजप आणि ड्रग्स पेडलर यांच्यातील संबंधांवर चर्चा करूया, असे लिहिले होते.

हा फटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना ‘बिगडा नवाब’, म्हटले आहे. तसेच, त्यांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांवर वार केला आहे. पत्रकार परिषदा घेत खोटे आणि धूर्तपणा आम्हाला ऐकवला. त्यांचे केवळ एकच लक्ष्य आहे आणि त्यांना अपला जावई आणि काळी कमाई वाचवायची आहे, असे अमृता यांनी म्हटले आहे.

यापूर्वी अमृता म्हणाल्या होत्या, देवेंद्र आणि माझी वेगळी ओळख आहे. जर कुणी माझ्यावर आरोप केले तर मी त्याला अजिबात सोडत नाही. याच बरोबर, नवाबांचा लवकरच पर्दाफाश होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. एवढेच नाही, तर जर ते पुरुष असतील तर, त्यांनी माझ्या माध्यमाने देवेंद्र यांना निशाना बनवू नये, असेही अमृता यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button