राजकारण

पंकजा मुंडेंना मोठा झटका; वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते सील

बीड : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. बँक खाते सील करुन पीएफची थकबाकी १ कोटी ९२ लाख रुपये वसूल करण्यात आली आहे. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. ही कारवाई म्हणजे पंकजा मुंडे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. परळी वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली होती.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे याची बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button