
आपल्या देशात संघ संस्कार घेऊन मनुवादी विचार परिपक्व झालेल्या असंख्य व्यक्ती समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात काम करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत जे घडले आणि ज्यांनी जाणीवपूर्वक मनुवादी संस्कार स्वीकारले ,जोपासले आणि गुणकाराने वाढवले अश्या काही व्यक्ती आता हळूहळू उघड्या पडत आहेत.कंगना राणावत हिने देशाचे स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याच्या नवा शोध लावल्यावर तिची थुंकी चाटण्याची जी स्पर्धा चित्रपट कलावंत करीत आहेत ती बघितली की अदृश्य मनुवादी दिसायला लागतो. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या अदृश्य मनुवादी लोकांच्या रांगेत असावेत याचा मला मोठा धक्का बसला आहे. कंगनाच्या त्या भिकारड्या वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन करताना विक्रम गोखले याना कसलीही लाज वाटत नाही यातच सगळे सामावले आहे.
कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलंय. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलंय. यावेळी मोदींचं कौतुक केलं. तर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल असंही त्यांनी म्हटलंय.
मोदींचे कौतुक, कंगणाचे समर्थन,भाजप सेना एकत्र येण्याची काळजी आणि हा देश कधीही हिरवा होणार नाही हे गैरसमज पसरवणारे वक्तव्य करणारे गोखले यांना नेमके काय म्हणायचे आहे हे आता कुणालाही सहज ओळखता येते, लोक शेंबडे राहिलेले नाहीत,शिक्षण घेऊन बिट विन द लाईन वाचायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आमच्या बापाने ते कधीच शिकवले आहे याचा विसर संघ परिवाराला पडला असेल तर त्यांनी वेड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाण्याचे हे धंदे बंद करायला हवेत.
स्वातंत्र्यासंबंधी कंगना राणावतने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असताना आता पुन्हा या वादात भर पडलीय, विक्रम गोखले यावेळी म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना विक्रम गोखले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी बोलताना कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य गोखले यांनी केलं. तिरंग्याच्या कट्टर प्रेमात आकंठ बुडालेला हा देश हिरवा होणार आहे हे गोखले याना कुणी सांगितले ? गोखले याना नास्तिक बनता बनता अचानक दिव्य दृष्टी कशी काय प्राप्त झाली ? की त्यांनी सनातन आश्रमाच्या वाऱ्या सुरू केल्यात की काय हा संशय यायला लागला आहे.
राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्राह्मन मध्य्ये भेेेद करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
लालबहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. असं वक्तव्य गोखले यांनी केलं.
जे ७० वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेनही, असं वक्तव्य अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं.
भारताला मिळालेले स्वातंत्र्य ज्यांना सतत सलत आहे त्यांच्या पंगतीत किमान विक्रम गोखले यांच्या सारखा अभिनेता बसणार नाही असे मला वाटले होते मात्र अपेक्षभंग झाला ,संघ स्वयंसेवक जगात कुठेही आणि कोणत्याही क्षेत्रात असो तो एकसारखा विचार करतो हे आज पुन्हा गोखले यांनी सिद्ध केले आहे . गोखले यांनी कंगना या दिवट्या नटीची री ओढताना किमान गोपाळकृष्ण गोखले यांचे एकदा तरी स्मरण करायला हवे होते परंतु संघी किडा मेंदूत घुसला तो मानवतेचे सगळे कप्पे नासवून टाकतो याचा अनुभव आला आहे.वयाच्या 75 व्या वर्षी गोखले यांच्या मेंदूतून असली घाण बाहेर पडत असेल तर हा आजार जुना आहे,खूप वर्ष ही घाण साचली होती आता उतार वयात तिला वाट मोकळी होतेय एवढाच त्याचा अर्थ आहे,विक्रम गोखले ही व्यक्ती कलावंत म्हणून भिकारडी आहेच मात्र माणूस म्हणूनही नीच असल्याचे त्यांनी आज सिद्ध केले आहे.




