Top Newsफोकस

नाशकात तीन बांगलादेशी नागरिकांना संशयावरून अटक

ATS च्या कारवाईने काय साध्य होणार?

नाशिक : पाथर्डी फाटा Pathardi Phata परिसरात भाडेतत्वावर घर घेऊन वास्तव करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना (Three Bangladeshi Nationals) एटीएस ATS ने अटक केली. यावेळी त्यांना राहण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीसही अटक करण्यात आली आहे. इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएसने रविवारी ही कारवाई केली. दरम्यान, हे बांगलादेशी संशयित केवळ वास्तव्यासाठी थांबून असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समाेर येत असून त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू किंवा पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे घातपाताचा इरादा सध्यातरी उघड हाेत नसल्याचे नाशिक शहर पाेलिसांनी स्पष्ट केले आहे. समाजात तेढ वाढविण्यासाठी पोलिसांकडून अशी कारवाई तर होत नाही ना, अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

एटीएसला तिघे बांगलादेशी संशयित नागरिक नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएसने थेट कारवाई करत एक बांगलादेशी महिला व दाेन पुरुषांना ताब्यात घेतले. घुसखोरी करत नाशकात प्रवेश करुन भाडेतत्वावर बांगलादेशी संशयित शागोर मोहंमद अब्दुल हसुने माणिक (वय २८), मुस्समत शापला खातून (२६), अति खानम मोहंमद शेख (२७) सर्व रा. काजी मंजील, पाथर्डी गाव, नाशिक हे वास्तव्य करत हाेते. त्यांना वास्तव्यासाठी सर्वोतोपरी मदत करणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२) याला अटक केली आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) नाशिक युनिटच्या सहायक निरिक्षक योगिता पांडुरंग जाधव यांनी संशयितांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button