Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात बदल घडवण्याचा प्रयत्न, पण विरोधकांकडून सुडाचं राजकारण : मोदी

नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, सोमवारी आपल्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनचौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामांची लेखाजोखा जनतेसमोर मांडला. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला.

आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचं राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, ज्याचं आचरणच ते दंगलीच्या मानसिकतेवाले लोक असल्याचे आहे, असं मोदी म्हणाले. जनचौपाल कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शामली, मुजफ्फरनगर, बागपत, सहारनपुर आणि गौतम बुद्ध नगर या ठिकाणच्या मतदारांना संबोधित केलं. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात नव्या शिक्षण संस्था, आयटीआय. नवी वैद्यकीय कॉलेजेस या ठिकाणी खुली झाली. इतकी विद्यापीठंही उभारली गेली, यामागे तरुणांची स्वप्न आणि आकांक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

डबल इंजिनचं सरकार उत्तर प्रदेशचा विकास दुप्पट वेगानं करत आहे. मागील सरकारने आपल्या पाच वर्षात गौतम बुद्ध नगरमध्ये केवळ ७३ घरे बांधली आहेत. या ५ वर्षात योगी सरकारन जवळपास २३ हजार घरं बांधून शहरी गरिबांना दिली आहेत. कुठे केवय़ळ ७३ घरं आणि कुठे २३ हजार घरं, याचा विचार करा. आज उत्तर प्रदेशात एक्सप्रेस वे, विमानतळांची संख्या दुप्पट होत आहे. उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे ५ शहरांमध्ये मेट्रो आहे आणि ५ शहरांमध्ये काम सुरू आहे, असंही मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशात राहणारी जनता यापूर्वीच्या सरकारला ओळखतात. त्यांनी भ्रष्टाचार आणि रियल इस्टेट माफियाची अशी युती केली एनसीआरमध्ये हजारो घर खरेदीदारांना आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागली. याचं मोठं नुकसान आपल्या मध्यम वर्गाच्या लोकांना सोसावं लागल्याचंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button