
नवी दिल्ली : भारतातील लसीकरण मोहिमेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतात २-१८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. डीसीजीआयने कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे.
सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात १२ वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.