स्पोर्ट्स

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचे जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत मोठे यश

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा जाणाऱ्या अनेक घटना गेल्या दीड वर्षात घडत असताना एका एपीआयच्या कर्तबगारीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले आहे. ताश्कंद -उझबेकिस्तान येथे १२ वी वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स चॅम्पियनशीप स्पर्धा ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत झाल्या.

पुजारी यांनी ८० किलोगटासाठी भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत सहभागी देशातील एकमेव पोलीस अधिकारी होते. सुभाष पुजारी हे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे (नवी मुंबई) येथे नेमणुकीला आहेत. २२ मार्चला लुधियाना येथे झालेल्या मास्टर भारत श्री व खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत त्यांनी ८० किलो गटातून सुवर्णपदक मिळविले होते. पुजारी हे २०१० तुकडीचे उपनिरीक्षक आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून हातकणंगले येथील आहेत. पोलीस ड्युटी सांभाळून त्यांनी व्यायामाची आवड जोपासली आहे. त्यांच्या यशाबद्दल गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराजे देसाई, पोलीस महासंचालक संजय पांडे, अप्पर महासंचालक (महामार्ग) भूषण उपाध्याय यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button