नाशिक : विवेकानंद रामकृष्ण जगदाळे… मूर्ती लहान पण कीर्ती महान… असा छोटी शारीरिक चणी असणारा हा माझा मित्र. आमची मैत्री ही काही फार पूर्वीपासूनची नाही. ती कॉलेजपासूनचीच आहे. त्या अगोदर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. कॉलेजमध्येही दिल्ली ट्रीपपासून आमची खऱ्या अर्थाने ओळख झाली. मैत्रीचे प्रकार असतात. आमची मैत्री ही वाईट प्रसंगातील मैत्री होती. रोज आम्ही एकमेकांना भेटणारही नाही] पण कोणाच्याही अडचणीत मात्र आम्हा दोघांना एकमेकांची आठवण येते.
अठरा विश्व दारिद्र्यातून वर आलेला हा माझा मित्र. मात्र त्याच्यात रिस्क घेण्याची अफाट काबिलियत आहे. आयुष्यात अनेक क्षेत्रात अनेक धोके त्याने पत्करले व तो त्यात तो यशस्वी झाला. त्याने निवडलेले क्रिकेटचे क्षेत्र हे त्यातलेच एक. त्याच्या यशस्वी जीवनाबद्दल सांगताना आमच्या वहिनींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. एक भक्कम आधार त्यांनी माझ्या मित्राला दिला. अशा अनेक आठवणी व अनेक प्रसंग आहेत, जे जाहीरपणे सांगणे शक्य नाही पण अशा संकटांच्या अडचणीच्या प्रसंगातच खरा मित्र समजतो.
कोणाचेही पाठबळ नसताना क्रिकेटसारख्या क्षेत्रात नाव निर्माण करणे छोटी गोष्ट नाही. असे आपले विशिष्ट स्थान स्वकर्तृत्वाने निर्माण करणाऱ्या मित्राला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…