‘एनआयए’कडून आतापर्यंत सचिन वाझेच्या ५ गाड्या जप्त
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात NIA कडून तपास मोहीम वेगानं सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणात NIA ने आता अजून एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. NIA ने आतापर्यंत 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहे. शिवाय एक ट्रॅडो गाडी वाझेंच्या कपाऊंडमधून ताब्यात घेतल्याचं सागंण्यात येत आहे. ही गाडी अजून NIA कार्यालयात आणली गेलेली नाही. शिवाय एक स्कोडा कारही NIAच्या रडारवर आहे. एकूण सहा गाड्या आतापर्यंत समावेश आहे. मात्र आतापर्यंत 5 गाड्या हाती लागल्या आहेत.
आता NIAच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु आहे. त्यामुळे या गाडीतून आता नेमकं कोणतं गूढ उकलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी NIAने एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. गुरुवारी दुपारी NIAने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणण्यात आली. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. NIA ने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मागच्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, ५ लाख रुपये रोख, एक पैसे मोजण्याचे मशीन आणि शर्ट सापडले होते. आता जप्त केलेली दुसरी मर्सिडीज कोण वापरत होते?, वाझेच वापरत होते का? असे प्रश्न आहेत.
NIA कडून प्रॅडो गाडीही ताब्यात
NIA ने जी टोयोटा प्रॅडो गाडी ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. बेसिक मॉडेलची किंमत 96 लाख 30 हजारांपासून सुरु होते. या गाडीची इंजिन क्षमता 2982 सीसी इतकी आहे. या कारचं मायलेज 11 किलोमीटर प्रतिलीटर आहे. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि 7 सीटर असलेल्या या भारदस्त कारमध्ये 7 एअरबॅग्ज आहेत.