Top Newsराजकारण

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची घोषणा; मुल्ला हसन अखूंद पंतप्रधान

काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान आपला कारभार कसा हाकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तालिेबानचं सरकार नेमकं कधी स्थापन होणार असाही प्रश्न विचारला जात होता. मात्र, तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची नुकतीच घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालिबान सरकारचे तसेच अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलीय. यात मुल्ला हसन अखूंद हे अफगाणिस्तानचे पंतप्रधान असतील. तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणाच पत्रकार परिषदेत केली. अखूंद हे पंतप्रधान असतील तर ज्यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती, ते मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान असतील. तालिबानच्या ह्या मंत्रिमंडळात हक्कानींना वजनदार मंत्रीपद भेटलेलं आहे. सिराजुद्दीनं हक्कानी हे गृहमंत्री असतील.

दमदार मंत्रिपद मिळावं म्हणून तालिबान आणि हक्कानींमध्ये तणाव निर्माण झालेला होता. त्याचं फळ हक्कानींना मिळाल्याचं दिसतंय. अमीर मुताकी हे परराष्ट्र मंत्री असतील. अब्दूल सलाम हंफू यांनाही उपपंतप्रधान करण्यात आलंय. म्हणजेच अखुंद हे पंतप्रधान आणि त्यांचे दोन डेप्युटी. बरादर आणि हंफू. दोन उपपंतप्रधान असलेला अफगाणिस्तान सध्या तरी एकमेव देश असावा

अफगाणिस्तानमध्ये आता जे तालिबाननं सरकारची घोषणा केलीय ते काळजीवाहू सरकार असेल असं तालिबानच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. याचाच अर्थ यात काही बदल अपेक्षित आहेत. हे अस्थायी सरकार आहे हेही तालिबाननं स्पष्ट केलंय. ह्या सरकारमध्ये तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये जे कुणी नेते मंत्री होते, त्या सर्वांना स्थान देण्यात आलंय. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमरच्या मुलालाही मंत्रीमंडळात स्थान आहे.

मुल्ला हसन अखूंद हा तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे यूएनची दहशतवाद्यांची जी यादी आहे त्यात मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच आहेत. गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख ही मिलिटरी लीडर कमी आणि धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत. पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचल्याचं मानलं जातंय.

मंत्रिमंडळात कोण कोण असणार ?

मुल्ला मोहम्मद हसन अखूंद (पंतप्रधान), मुल्ला बरादर, अब्दूल सलाम हंफू (उपपंतप्रधान), सिराज हक्कानी (गृहमंत्री), खैरउल्लाह खैरख्वा (माहिती मंत्री), अब्दूल हकीम (कायदामंत्री), मुल्ला याकूब (संरक्षणंमंत्री), मुल्ला अमीर खान मुत्ता (परराष्ट्रमंत्री).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button