राजकारण

फडणवीसांनी बाजू घेतलेल्या ब्रुक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला गुजरातमध्ये अटक

दमण : ज्या रेमडीसिवीरच्या ब्रुक फार्मा कंपनीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्याच कंपनीबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे. ज्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना आणि दोनही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांना रात्रीचं पोलीस स्टेशन गाठावं लागलं. आता त्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे रेमडीसिवीर इंजेक्शन ब्लॅकने विकल्याची माहिती समोर आली आहे.

वलसाड पोलिसांनी गुरुवारी 15 एप्रिलला दोन व्यक्तीला 18 इंजेक्शनसह सापळा रचून पकडले. हे दोनही व्यक्ती एक इंजेक्शन 12 हजार रुपयाला विकत होते. देशात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना या लोकांकडे हे इंजेक्शन कुठून आले यांची चौकशी केली असता, त्यांनी दमणमधील आटीयावाड स्थित ब्रुक फार्मा कंपनीमध्ये त्यांचा मित्र मनिष सिंह टेक्निकल डायरेक्टर पोस्टवर असल्याचं सांगितलं. त्याच मनिष सिंहने त्यांना हे इंजेक्शन दिल्याचे या दोनही व्यक्तीने कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी मनिष सिंहला ही पकडले. त्यावेळी त्याच्याकडे 6 इंजेक्शन सापडले. आता पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस बाजू घेत असलेल्या कंपनीचा एक कर्मचारी अशा प्रकारे काळ्या बाजारात इंजेक्शन विकत असल्याचं समोर आल्यानं महाराष्ट्रात देखील या कंपनीची चर्चा सुरु आहे. कारण महाराष्ट्र पोलिसांनी देखील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांनी रात्री पोलिस स्टेशनला धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सोडून दिल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस बाजू घेत असलेल्या कंपनीचा एक कर्मचारी अशा प्रकारे काळ्या बाजारात इंजेक्शन विकत असल्याचं समोर आल्यानं महाराष्ट्रात देखील या कंपनीची चर्चा सुरु आहे. कारण महाराष्ट्र पोलिसांनी देखील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांनी रात्री पोलिस स्टेशनला धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सोडून दिल्याचं बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button