Top Newsफोकस

तीन राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के; राजस्थानच्या बिकानेरमध्ये ५.३ तीव्रतेचा हादरा

नवी दिल्ली : देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात गेल्या काही तांसांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात राजस्थानाच्या बीकानेरमध्ये ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. मेघालयातही भूकंपाचे झटके बसले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बीकानेरमध्ये सकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.३ एवढी मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे, की मेघालयातील वेस्ट गारो हिल्स भागांतही सकाळी २.१० मिनिटांनी भूकंप आला होता. या झटक्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ एवढी मोजली गेली. लेह लडाखमध्ये पहाटे ४.५७ वाजता भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ मोजली गेली

यापूर्वी, गुजरातच्या कच्छ भागातही १८ जुलैला भूकंपाचे झटके बसले होते. तेव्हा रिश्टर स्केलवर याची तीव्रता ३.९ एवढी मोजली गेली होती. यापूर्वी याच महिन्यात हिमाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि दिल्लीतही भूकंपाचे झटके बसले होते. भूकंपाचे झटके जाणवल्यास मुळीच घाबरू नका. सर्वप्रथम, आपण एखाद्या इमारतीत असाल तर त्या इमारतीतून बाहेर मैदानात या. इमारतीतून खाली येताना लिफ्टचा वापर करू नका. हे भूकंपाच्या काळात धोकादायक ठरू शकते. तसेच, इमारतीतून खाली येणे शक्य नसेल, तर जवळच्या एखाद्या टेबलाखाली अथवा बेड खाली लपा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button