अर्थ-उद्योग

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांच्या गाडीची जबाबदारी ‘जैश-उल-हिंद’ने स्वीकारली

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम अ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांच्या मागणीविषयीही उल्लेख आहे.

ज्या व्यक्तीने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तरी सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करू शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली; पण काही झाले नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहीत आहे, की काय करायचे आहे. तुम्हाला आधी सांगितले आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा, असा मेसेज टेलिग्राम अ‍ॅपवर लिहिण्यात आला आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान बंगल्याबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली स्कॉर्पियो कार गुरुवार 25 फेब्रुवारीला सापडली होती. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ही कार 24 फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर पार्क करण्यात आली होती. ही कार त्याआधी 12.30 वाजता हाजी अली जंक्शनला पोहोचली होती. या ठिकाणी ही कार 10 मिनिटे थांबली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button