मुंबई : शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी चळवळीशी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही अखेर गुरुवारी खार पोलिसांसमोर हजर झाली. शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच प्रकरणी चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले होते.
कंगना तिच्या कारने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात आली. कारमधून उतरताच तिला तिचे अंगरक्षक आणि पोलिसांनी घेरले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिचा जबाब नोंदविण्यात आला. तिने जबाबात काय सांगितले, याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी जवळपास दीड तास तिची चौकशी केली.