फोकसराजकारण

गांधी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते डॉ. एस. एन. सुब्बाराव यांचे निधन

सेवाग्राम (वर्धा) : देशातच नव्हे तर जगात गांधी विचार, कार्य, राष्ट्रीय एकात्मता, युवकांसाठी प्रेरणास्थान आणि चंबल खोऱ्यांतील कुख्यात डाकुंच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचे कार्य करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे मुरैना येथील आश्रमात बुधवारी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षाचे होते. ते अनेकदा सेवाग्राम वर्धा येथे विविध कार्यक्रमानिमित्ताने आलेले असल्याने एक वेगळी आस्थानी प्रेम जिल्ह्याप्रति होते.

डॉ. सुब्बाराव‌ यांचा जन्म बंगलोर येथे झाला.पण त्यांची कर्मभूमी मात्र चंबल खोऱ्यातील मुरैना येथील आश्रम ठरला. ते गांधी विचारांचे असले तरी फक्त विचार‌ सांगणारे नव्हते. त्या काळात जंबल‌ खोरे डाकु़च्या कारवाईनी चांगलेच गाजले होते. अशातच जयप्रकाश नारायण यांच्या सहयोगाने ११० कुख्यात डाकुंचे समर्पन करण्यात आले. तेही गांधी विचारांवर पण नंतर कामाचा प्रश्र्न आला असता मुरैना येथे त्यांना पुनर्वसनासाठी काम सुरू केले. रोजगार सुरू झाला. यातूनच आश्रमातील नवीन दिशा व गती विधी सुरू झाली.आश्रमातूनच इतरांना दिशा‌मिळून दशा बदलायला लागली. आश्रम बनला पण ते तिथे कधीच रमले नाही.देशभरात युवकांचे राष्ट्रीय युवा प्रकल्प अंतर्गत शिबीर सुरु केले.

सेवाग्राम येथे ते सर्वोदय संमेलन,शिबिरात नेहमीच येत असत. आश्रमात प्रार्थनेतील भजनांनी कार्यकर्ते तल्लीन‌ होत.जुन्या वस्तीत देशभरातील युवकांचा कार्यक्रम श्री मारूती देवस्थान समोर घेतला होता.त्यांची गाणी भारावून टाकणारी अशीच होती. विशेष म्हणजे अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी आश्रम लोकांसाठी बनविला. कामातून जीवन बदलण्याची प्रेरणा दिली. देश विदेशातील युवकांना प्रेरीत करण्याचे काम अखेर पर्यंत करीत राहिले.भिन्न भाषा भिन्न वेष भारत हमारा एक देश, जोडो जोडो भारत जोडो या घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण होऊन देश त्यांना कधीच विसरू शकत नाही. त्यांनी सरकारचे युवकांकडे दुर्लक्ष असल्याच्या कारणावरून युवकांच्या भल्यासाठी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. चंबल येथील कुख्यात डाकुंनी आचार्य विनोबा भावे यांच्या समोर समर्पन केले होत. सर्व जन सेवाग्राम येथील आश्रमच्या गोशाळा परिसरात परिवारासह मुक्कामला होते.या प्रसंगाचे साक्षीदार रामकृष्ण चव्हाण परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button