यवतमाळमध्ये सॅनिटायझर प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू
यवतमाळ : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये दारुची दुकान बंद आहेत. त्यामुळे दारुची तहान भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले आहेत. यात ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. यातील सहा मृतांची नावे समोर आली आहेत. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे, गणेश शेलार यांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे.