आरोग्य

भारतात आणखी २-३ महिने लसींचा तुटवडा : अदर पुनावाला

लंडन : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय प्रशासन आग्रही दिसत आहे. किंबहुना त्यासाठी पावलंही उचलण्यात येत आहेत. असं असतानाच आता देशात लसींचा मात्र तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठाही पुरेसा नाही हेच चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी येत्या २-३ महिन्यांपर्यंत लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहील असं सूचक वक्तव्य केलं आहे.

लंडनमधील ‘फिनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पुनावालांनी हे वक्तव्य केलं. सध्याच्या घडीला एका दिवसाला ६-७ कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच १० कोटींवर पोहोचू शकेल अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळं याआधी कंपनीनं लसींचं प्रमाण वाढवलं नवंहतं. ज्यामुळंच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत. लसीला पुढे मागणी नव्हती. आम्ही विचारही केला नव्हता की एका वर्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करावी लागेल.

संबंधित यंत्रणेला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर जानेवारी महिन्यापासून अपेक्षितच नव्हता. सर्वांना खरंच वाटत होतं की कोविडच्या संकटाला आपण थोपवू लागलो आहोत, असंही ते या मुलाखतीत म्हणाले. मागील महिन्यात शासनानं सिरमला ३ हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती. १८ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठीही ही तरतूद होती, ही महत्त्वाची माहिती पुनावाला यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button