आरोग्य

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडा मात्र चिंताजनक

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात २ लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडा मात्र चिंताजनक आहे. तब्बल ४ हजार १०६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

गेल्या आठवड्यात २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८१ हजार ३८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार १०६ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ३ लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ७४ हजार ३९० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात २ कोटी ११ लाख ७४ हजार ७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३५ लाख १६ हजार ९९७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात ६ लाख ९१ हजार २११ जणांना लसीकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button