अर्थ-उद्योग

नाशिकमध्ये उद्योग जगत उभारणार २० ऑक्सिजन जनरेशन प्लांट

आयमा पदाधिकाऱ्यांचा पुढाकार; प्रशासनाला देणार १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

नाशिक : कोरोनाची संपूर्ण जगात, देशात तसेच महाराष्ट्रात व नाशिकमध्ये सुद्धा गेल्या वर्षी पासून जी लाट आलेली होती त्या लाटेला सर्व नाशिककर जनतेने तसेच महापालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने अतिशय सक्षमपणे तोंड देऊन थोपवण्यात यशस्वी झालो. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मधल्या टप्प्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात तसेच नाशिकमध्ये हाहाकार उडवून दिला आहे, या लाटेला थोपवण्यासाठी आपले जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन, एमआयडीसी तसेच सर्व अधिकारी, आरोग्य खाते हे अतिशय कठोर परिश्रम करून यावर उपाययोजना करीत आहेत

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आयमाच्या माध्यमातून उद्योग जगत सुद्धा प्रशासनाबरोबर संपूर्ण सहकार्याची भूमिका घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून व सक्षम पणे मदत करण्याकरिता आयमाच्या माध्यमातून आपण नाशिक मधील सर्व मोठ्या, लघु व मध्यम उद्योगांना मदतीचे आवाहन करुन नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यता कमतरता भासत असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर कायमस्वरुपी पर्याय करण्याच्या दृष्टिकोनातून हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्लांट व तसेच आत्ताच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय उपयुक्त ठरलेले असे १००० नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट उपलब्ध करून देण्याकरिता आयमाने पुढाकार घेऊन मोठ्या उद्योगांच्या सीएसआर निधीमधून जवळपास २० नग हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट तसेच मध्यम व छोट्या उद्योगांच्या माध्यमातून १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट देण्याकरता त्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे व त्या आवाहनाला सर्व मोठे उद्योग लघु मध्यम उद्योग व वैयक्तिक उद्योजका कडून अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळत असून उद्योजकांनी स्वतःहून पुढे येऊन याकरता कामा मदत करण्याचे आश्वासन आयमा पदाधिकाऱ्यांना दिले आहे

याचाच भाग म्हणून आज आयमामध्ये जवळपास ३५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट हे उद्योजकांनी आयमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज देण्याचे कबूल केले व त्या करिता निधी तसेच प्रत्यक्ष ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज एमआयडीसीचे विभागीय अधिकारी माननीय नितीन गवळी यांच्या उपस्थितीमध्ये आयमा पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले तसेच उद्योजक राजेंद्र कोठावदे व श्री लीदुरे यांनी आयमा च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांची कंपनी धनराज स्विचगीयर प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून त्यामधून निर्माण होणारा सर्व ऑक्सिजन कोरोना संकट काळामध्ये सर्व कामगार उद्योजक तसेच शासनाला मोफत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी आयमाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी बोलताना सर्व उद्योजकांना आयमा करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व आपण विविध मोठ्या कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांना यासाठी मदतीचे आवाहन केल्याचे सांगितले व सर्व लहान मध्यम उद्योगांकडून आम्ही निश्चित 1000 कॉन्सन्ट्रेटर जमा करून शासनाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन श्री गवळी साहेब यांना दिले.

अंबडमध्ये आय टी पार्क व त्यालागताच्या उद्योजकांच्या प्लॉट मध्ये साडेपाचशे खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर महानगर पालिके तर्फे उभे राहत असून त्या साठी देखील आयमा ने संपूर्ण सहकार्य व पुढाकार घेतल्याचे सांगितले व त्यासाठी सुद्धा उद्याजकांचे संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी प्रतिपादन यावेळेस केले,

प्रारंभी निखिल पांचाळ यांनी आलेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. याप्रसंगी नितीन गवळी यांनी बोलताना आयमा या संघटनेचे पदाधिकारी व उद्योजक करीत असलेली मदत व विशेष करून आयमाने घेतलेल्या हा जो संकल्प आहे हा येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटे करिता खूपच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करून आयमा च्या कार्याचे कौतुक केले. विशेषता गेल्या महिन्याभरापासून धनंजय बेळे, निखील पांचाळ, ललित बूब हे आमच्या खांद्याला खांदा देऊन आमच्याबरोबर काम करीत असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. आयमा ला या कामा साठी जी मदत आमच्याकडून लागेल ती सर्व मदत आम्ही करण्यास बांधील असल्याचेही त्यांनी या वेळेस नमूद केले.

याप्रसंगी दहा नग कॉन्सन्ट्रेटरचा चेक किशोर राठी, ५ नग कॉन्सन्ट्रेटर जयंत जोगळेकर यांनी तसेच दहा कॉन्सन्ट्रेटर इंनोवा रबर्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत, सिग्नेचर लिमिटेड या दिंडोरीच्या कंपनीचे हेड यतीन पटेल यांनी प्रत्यक्ष दोन कॉन्सन्ट्रेटर लंडनहून मागून आयमाकडे सुपूर्द केले व इतर उद्योजकांनी प्रत्येकी एक दोन असे जवळपास ३५ नग कॉन्सन्ट्रेटर यावेळेस देण्याचे कबूल केले. तसेच आयमा आवाहनाला प्रतिसाद देऊन सी एस सिंग व सहकारी दोन उद्योजकांनी शंभर टनाचा लिक्विड ऑक्सीजन निर्मिती चा प्लांट उभारण्याचा मानस सुद्धा याठिकाणी व्यक्त करून त्यासाठीची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगितले

या कार्यक्रमाला आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर रेपाळे, राजेंद्र अहिरे, गोविंद जा, सी एस सिंग, यतीन पटेल, किशोर राठी, अभिजित राठी, आदी उपस्थित होते. ललित बूब यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button