अर्थ-उद्योग

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ८ मोठ्या घोषणा; आरोग्य क्षेत्राला मोठा निधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस दिलाय. त्यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा निधी देताना ८ महत्त्वाच्या घोषणा केल्यात. सीतारमण म्हणाल्या, आजच्या ८ उपाययोजनांमध्ये ४ उपाय नवे आहेत आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत. या अंतर्गत कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी ५० हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी ६० हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल.

– कोविडने प्रभावित क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम

कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी ५० हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी ६० हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल.

– आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मुदतवाढ

सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही योजना १ ऑक्टोबर २०२० रोजी लाँच करण्यात आली होती. ही योजना आता ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेत सरकारने २२ हजार ८१० कोटी रुपये गुंतवणूक केलीय.

https://twitter.com/PIBMumbai/status/1409447834898681856

– २५ लाख जणांना MFI च्या माध्यमातून १.२५ लाखपर्यंतचं कर्ज

मायक्रो फायनान्स इंस्टिट्यूशन्सच्या (MFI) मदतीसाठी २५ लाख जणांना क्रेडिट गॅरंटी स्कीमची घोषणा करण्यात आली. हे कर्ज MCLR+ २ टक्के दराने मिळेल. कर्जाचा कालावधी ३ वर्षे असेल. जास्तीत जास्त कर्ज घेण्याची मर्यादा १.२५ लाख रुपये असेल. यासाठी ७,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेचा लाभ ३१ मार्च २०२२ पर्यंत घेता येईल.

– ११ हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी योजना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ११ हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी घोषणा करण्यात आलीय. या योजनेत नोंदणीकृत संस्थांना १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गॅरंटी देण्यात येणार आहे.

– ५ लाख परदेशी पर्यटकांकडून व्हिसा शुल्क नाही

भारतात परदेशी प्रवाशांना येण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्या ५ लाख परदेशी पर्यटकांना व्हिसा शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. ही सूट ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असणार आहे.

– शेतकऱ्यांना खतांसाठी अतिरिक्त १५००० कोटींचं अनुदान

शेतकऱ्यांना प्रोटिन आधारित खतांवरील सबसिडीच्या रुपात अतिरिक्त १५,००० कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. DAP आणि P&K फर्टिलायजरसाठी (खते) अतिरिक्त अनुदानाची (सब्सिडी) घोषणा करण्यात आलीय. या खरीप हंगामात ४३२.४८ लाख मेट्रीक टन गहू खरेदी सरकारने केलाय. मागील वर्षी ३८९.९२ लाख मेट्रीक टन गहू खरेदी केला होता. शेतकऱ्यांना यातून ८५ हजार ४१३ कोटी रुपये देण्यात आले.

– प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आलीय. यानुसार मे ते नोव्हेंबर २०२१ या काळात मोफत धान्य वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ९४ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे एकूण या योजनेवर २.२८ लाख कोटी रुपये खर्च होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button