तंत्रज्ञान

‘रोटो पेटल डिस्क ब्रेक्स’ असलेली टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन सादर

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने ‘रोटो पेटल डिस्क ब्रेक्स’ असलेली टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन सादर केली. या डिस्क प्रकारामध्ये सध्या काळा-लाल अशी दुहेरी कलर टोन थीम उपलब्ध असून याची किंमत 67965 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशनमध्ये ईटी-एफआय (ET-Fi) तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे ही गाडी १५% जास्त मायलेज देते. एलईडी हेडलॅम्प, युएसबी मोबाईल चार्जर ही वैशिष्ट्ये असलेली टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन या श्रेणीतील सर्वात प्रीमियम गाड्यांपैकी एक आहे. ‘ऑलवेज मुविंग अहेड’ अर्थात ‘नेहमी पुढे जात राहण्याच्या’ टीव्हीएस स्टार सिटी+ च्या १५ वर्षांच्या परंपरेनुसार आणि ३० लाखांपेक्षा जास्त सुखी ग्राहकांना अधिक जास्त आनंद मिळवून देण्यासाठी ही एडिशन तयार करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button