तंत्रज्ञान

कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन ?

dg24 : तंत्रज्ञान साठी
Vijay Babar
Thu 11/02/2021 17:54

View more

45 वर्षे जुना कॉम्प्युटर, किंमत फक्त 11 कोटी रुपये!

नवी दिल्ली :  कोणतीही वस्तू जेव्हा आपण सेकंड हँड घेतो तेव्हा त्याची किंमत मूळ खरेदी किंमतीपेक्षा कमीच असते. किंबहुना एखादी जुनी खरेदी करण्यापेक्षा थोडे पैसे टाकून नवी वस्तू घेण्यालाच प्राधान्य दिलं जातं. असं असताना एखादा 45 वर्षे जुना कॉम्प्युटर  तब्बल 11 कोटी विकला जातो आहे, हे सांगितलं तर तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटेल ना?

45 वर्षे जुना कॉम्प्युटर तोसुद्धा 11 कोटी रुपयांना कोण खरेदी करणार असंही तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, तर हा कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल इतकं या कॉम्प्युटरमध्ये काय खास आहे.  कॅलिफोर्नियाची जगप्रसिद्ध टेक कंपनी ॲपल आहे. या कंपनीचा मोबाईल आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या कंपनीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी अनेकांनी किडनी विकण्यास ही तयारी दर्शवली आहे. याच कंपनीचा हा कॉम्प्युटर आहे.

सध्या ई-बेवर (eBay) ॲपल-1 कॉम्प्युटरची विक्री केली जात आहे. याची किंमत 1,500,000.00 म्हणजे 11 कोटींच्या आसपास आहे.  ॲपलचे दिवंगत को-फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी हा कॉम्प्युटर तयार केला होता. स्टीव्ह जॉब्स यांनी को-फाऊंडर स्टीव्ह वॉजनिएकच्या मदतीने तयार केला होता. 1976 साली हा कॉम्प्युटर तयार करण्यात आला होता.

ई-बेवर (eBay) ॲपल-1 कॉम्प्युटरची माहिती देण्यात आली आहे. हा कॉम्प्युटर आजही चांगला आहे. eBay च्या जाहिरातीनुसार  ‘ही एक दुर्मिळ संधी आहे. कारण आता फक्त सहापेक्षा कमी ओरिजनल बाइट शॉप KOA वुड केसेज राहिले आहेत. त्यामधील बहुतेक केसेज संग्रहालयात संग्रहित करण्यात आले आहेत. या केसेजमधील हा चांगल्या अवस्थेतील आहे. याला स्पेशल स्टोरेजमध्ये धूळ आणि ओलाव्यापासून सुरक्षित ठेवले आहे.’

या कॉम्प्युटरच्या मालकाने हे सुद्धा सांगितलं की, ‘तो या कॉम्प्युटरचा दुसरा मालक आहे. 1978 च्या सुरुवातीला त्यांनी हा कॉम्प्युटर त्याच्या मूळ मालकाकडून नवीन ॲपल-2 कॉम्प्युटर देऊन खरेदी केला होता.’

1976 मध्ये कंपनीने या कॉम्प्युटरला तयार केलं होतं. हे कंपनीकडून ग्राहकांना विकलं गेलेलं पहिलं प्रोडक्ट होतं. लाँच वेळी या कॉम्प्युटरची किंमत 666.66 डॉलर म्हणजेच जवळपास 48,600 रुपये इतकी होती. जर तुम्हाला हा कॉम्प्युटर खरेदी करायचा असेल तर इथं करून खरेदी करू शकता.

————

मोबाइल अॅप ‘अशी’ रोखणार शेतकऱ्यांची फसवणूक

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तोतया व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून रोजचे शेतमालाचे बाजार भावदेखील क्षणार्धात समजणार आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, बटाटा, लसूण व फळ घेऊन शेतकरी येतात. त्यांची सुरक्षितता वाढावी व त्यांची बाजार समिती आवाराबाहेर होणारी फसवणूक होऊ नये, यासाठी सभापती पिंगळे यांच्या संकल्पनेतून समितीने ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ‘स्टॅटिक जीएसएम’चे संचालक गौरव मुंगसे यांनी हे ऍप तयार केले आहे. यात बाजार समिती आवारात शेतमालाचा बाजारभाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाईल. जेणेकरून ज्या शेतकऱ्यांस शेतमालास मिळालेला बाजारभाव माहिती होइल.
नाशिक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागू नये. तसेच आवारात लिलाव प्रक्रियेदरम्यान, व्यापारी, आडते, हमाल किंवा अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या अॅपच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. तसेच बाजार समितीस कळवूनही वेळीच मदत मिळत नसेल, तर शेतकरी या अॅपच्या माध्यमातून थेट सभापती, संचालक मंडळाशी संपर्क साधता येणार आहे.

———–

कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन ?

नवी दिल्ली : कुरापतखोर चीन कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचेल, याचा नेम राहिला नाही. भारताच्या बाजारपेठेत सध्या तितकासा प्रतिसाद मिळत नसलेल्या चीनने आता कू अ‍ॅपशी कनेक्शन जोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कू अ‍ॅप हे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अ‍ॅप असल्याच्या विश्वासातून युजर्स याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. परंतु या अ‍ॅपने भारतीयांच्या विश्वासाला तडा दिला आहे. हे अ‍ॅप भारतीयांचा डेटा लीक करीत आहे. चीनसाठी हा डेटा लीक केला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे कू अ‍ॅप वापरात असाल तर जरा जपून राहा.
कू अ‍ॅपने मागील 24 तासांत 30 लाख डाउनलोड्सचा रेकॉर्ड तयार केला आहे. फ्रान्समधील सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट बॅप्टिसे यांनी हे अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. या अ‍ॅपने युजर्सचे ईमेल आयडी, फोन नंबर, जन्मतारीख आदी संवेदनशील डेटा लीक करण्याचा छुपा कारनामा सुरू केला आहे. बॅप्टिसे हे ट्विटरवर एलियट अ‍ॅण्डरसन नावाने ओळखले जातात. त्यांनी आधार कार्डच्या सिस्टममधील त्रुटींची पोलखोल केली होती. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते.

बॅप्टिसे यांनी काल रात्री जवळपास 30 मिनिटे कू अ‍ॅपचा वापर केला. यावेळी त्यांना कू अ‍ॅप युजर्सचा वैयक्तीक गोपनीय डेटा लीक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही शेअर केले आहेत. आतापर्यंत अनेक युजर्सचा डेटा लीक झाला आहे. यात केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच मंत्र्यांचा डेटाही सामील आहे. कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन असल्याचा दाट संशय आहे. मात्र यासंदर्भात अजून बॅप्टिसे यांना ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. डोमेन पाहिल्यानंतर त्याच्या काही भागांचा चीनशी कनेक्शन असल्याचा अंदाज येत आहे. या डोमेनची चार वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली होती. आतापर्यंत हा डोमेन अनेक लोकांच्या हातात गेला आहे.

ड्रग्ज विकण्यासाठी होऊ शकतो डोमेनचा वापर
कू अ‍ॅपच्या डोमेनचा गैरकृत्यांसाठी वापर होण्याची भिती आहे. अवैध ड्रग्ज विक्रीसाठीही डोमेनचा उपयोग केला जाऊ शकतो. याआधी अशा प्रकारे बेकायदा कृत्ये करण्यात आली आहेत. अ‍ॅपमध्ये शुनवेईसारखा छोटा गुंतवणूकदार आहे. त्यामुळे अ‍ॅपचे चीनी कनेक्शन असल्याची शक्यता बळावली आहे. कू अ‍ॅप ही भारतातील रजिस्टर्ड कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक भारतीयच आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button