अर्थ-उद्योग

एनएसडीसीची ‘सहीपे’सोबत हातमिळवणी

नवी दिल्ली : देशामध्ये डिजिटल सबलीकरण आणि आर्थिक सर्वसमावेशकता आणण्यासाठी वित्तीय सेवा क्षेत्रातील तरुणांमध्ये नॅनो-उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे ध्येय समोर ठेवत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (एनएसडीसी) मणिपाल बिझनेस सोल्युशन्स (एमबीएस) यांनी विकसित केलेल्या सहीपे या अँड्रॉइड आधारित एकात्मिक मंचाशी सहयोग साधत असल्याची घोषणा आज केली. डिजिटल वित्तीय सेवाक्षेत्रातील युवकांच्या कौशल्यविकासाला पाठबळ पुरविणे आणि त्यांना शाश्वत जीवनमानासाठी स्वयंरोजगाराचे मार्ग धुंडाळण्याची संधी देणे हे या सहयोगामागचे उद्दीष्ट आहे. उमेदवारांना एनएसडीसीच्या ईस्किल इंडिया पोर्टलच्या माध्यमातून ‘ऑनलाइन आंत्रेप्रीन्‍युअरशीप प्रोग्राम द्वारे डिजिटल कौशल्य विकास अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. दोन्ही संस्थांमधील वित्तीय सर्वसमावशकतेच्या क्षेत्रातील तसेच कौशल्यविकासाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या अभ्यासक्रमासाठीच्या साहित्याची निवड व संपादन केले आहे.

ईस्किल इंडियाने एमबीएसच्‍या सहीपे मंचाशी केलेल्या या भागीदारीमुळे तरुणांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्ये उपलब्ध होण्यास मदत होईल आणि वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार आणि नॅनो-उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी एक सर्वंकष परिसंस्था तयार होण्यास मदत होईल. एनएसडीसीची डिजिटल स्किलिंगच्या क्षेत्रातील निपुणता, प्रशिक्षणासाठीची मजबूत पायाभूत व्यवस्था आणि विस्तृत नेटवर्क या वैशिष्ट्यांची तरुणांना आपली रोजगारक्षमता आणि उत्पादनशीलता वाढवता यावी या विशिष्ट हेतूने कौशल्य विकास कार्यक्रमांची रचना आणि आयोजन करण्याच्या क्षेत्रातील SahiPayच्या ज्ञानाशी सांगड घालावी हे या भागीदारीचे लक्ष्य आहे. हा ई-अभ्यासक्रम उमेदवारांना डिजिटल वित्तीय सेवाक्षेत्राविषयीचे ज्ञान देईल, स्वयंरोजगाराच्या दिशेने नेणारी कौशल्ये प्रदान करेल व त्यांना सहीपेचा भाग बनण्याची संधी देईल. देशभरातील तरुणांमध्ये डिजिटल अर्थव्यवहारांच्या साक्षरतेबद्दल अधिक व्यापक स्तरावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच या उद्योगक्षेत्रामध्ये असलेल्या स्वयंरोजगाराच्या अनेक संभाव्य संधींना ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एनएसडीसी आणि सहीपेद्वारे अनेक डिजिटल आणि ऑन-ग्राउंड उपक्रमही राबवले जातील.

या सहयोगाबद्दल बोलताना श्रीम. वंदना भटनागर, एनएसडीसी म्हणाल्या, “भारतीय डिजिटल पेमेंट्स उद्योगक्षेत्राच्या विकासाचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे आणि येत्या पाच वर्षांमध्ये हे क्षेत्र अनेक पटींनी विस्तारेल, असा अंदाज आहे. तरुणांना डिजिटल अर्थव्यवहारांच्या साक्षरतेसाठी आवश्यक ते ज्ञान आणि प्रशिक्षण प्रदान करून आणि भविष्यात त्यांनी स्वत:चा शाश्वत विकास साधण्यासाठी नॅनो-उद्योजकतेचा मार्ग स्वीकारावा यासाठी त्यांना या क्षेत्रात येत असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.“

या सहयोगाअंतर्गत अभ्याक्रमासाठी नाव नोंदवलेल्या उमेदवारांना भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगक्षेत्राविषयी शिकता येईल व त्याचबरोबर उद्योजकता, नो युअर कस्टमर (केवायसी), सुरक्षितता आणि नियमपालन, संवादकौशल्य, बँकिंग सेवा, एईपीएस बँकिंग, पेमेंट सर्व्हिसेस (यूपीआय, क्‍यूआर कोड, कार्ड्स), डोमेस्टिक मनी ट्रान्सफर, मूल्यवर्धित सेवा (बिल भरणा/ रिचार्जेस) आणि सहीपे प्लॅटफॉर्म व सेवा यांसारख्या विषयांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म कसे चालतात, हे शिकवले जाईल. हा उपक्रमआपल्या विविध योजनांच्या माध्यमातून एक दीर्घकालीन टिकाऊ बिझनेस मॉडेल आणि यंत्रणा पुरवू शकेल, ज्यातून एक नियमित उत्पन्न मिळविण्याची सोय होऊ शकेल. सहीपेवर नावनोंदणी केलेल्या उद्योजकांना एक मासिक सरासरी उत्पन्न मिळू शकेल इतकेच नव्हे तर कोणत्याही ग्राहकाला त्याच्या गरजांनुसार उत्पन्नाचे साधन देणा-या सेवा पुरवू शकेल.

या सहयोगाबद्दल आपले मत व्यक्त करताना मणिपाल टेक्नोलॉजीज लि. चे एमडी आणि सीईओ श्री. अभय गुप्ते म्हणाले. ‘’डिजिटल अर्थव्यवहारांबद्दलची साक्षरता आणि नॅनो-उद्योजकता निर्माण करणे हा एक विशिष्ट आर्थिक उद्योजकता कार्यक्रम आहे, ज्यातून भारतीय बँकिंग आणि वित्तीय उद्योगक्षेत्राविषयीचे सर्वंकष ज्ञान मिळू शकते आणि सहीपेद्वारे पुरवला जाणारा एकात्मिक पेंमेंट प्लॅटफॉर्म कसा चालतो याची तांत्रिक माहितीसुद्धा या कार्यक्रमातून मिळते. ‘’

उमेदवारांना तत्काळ उत्पादनक्षम बनवणे व त्यांना सहीपेच्या वैविध्यपूर्ण सेवांच्या माध्यमातून उत्पन्नाची संधी मिळवून देणे हे याकौशल्याधारित उद्योजकता कार्यक्रमाचे लक्ष्य आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button