आरोग्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजभवनात योगा

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला. योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली.

सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिटयूट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. २१ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २७ सप्टेंबर २०१४ रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button