राजकारण

येडीयुराप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या

बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज यांनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या सौंदर्या यांनी शुक्रवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

येडीयुराप्पा यांची नात शुक्रवारी बंगळुरूच्या वसंतनगर येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडली. सौंदर्या नीरज ही रामय्या हॉस्पटलमधे डॉक्टर होती. तिचे डॉ. नीरज याच्याशी २०१९ मध्ये लग्न झाले होते. सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. मोलकरणीने बराच वेळ दरवाजा ठोठावला परंतू आतून दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून तिने डॉ. नीरजना फोन करून माहिती दिली. नीरजनी घरी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा सौंदर्या हिचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

सौंदर्या डिप्रेशनच्या शिकार

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सौंदर्या यांनी त्यांच्या मुलाला दुसऱ्या खोलीत सोडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौंदर्या या डिप्रेशनच्या शिकार होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नीरज शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये गेले. तर सौंदर्या आणि त्यांचं लहान बाळ घरी होते. त्याचवेळी घरात काम करणाऱ्या कामवालीने नीरज यांना फोन करून मॅडम दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. कामवालीचे बोलणे ऐकून धक्का बसलेल्या नीरज यांनी कामावरून सौंदर्या यांना फोन केला. मात्र काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा ते तातडीने घरी आले. नीरज यांनी घरी आल्यावर सौंदर्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर दरवाजा तोडला असता सौंदर्या ह्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी फ्लॅटवर जाऊन सौंदर्यांचा मृतदेह खाली उतरवला. तसेच पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह काही मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. सौंदर्या यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी डॉ. नीरज यांच्याशी झाले होते. सौंदर्या यांना चार महिन्यांचे एक बाळ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button