Top Newsराजकारण

यशवंत जाधवांनी भुजबळांनाही मागे टाकलं; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. यशवंत जाधव यांनी छगन भुजबळ यांनाही मागे टाकलं. जाधव यांनी १०० कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. १०० रुपयांचा शेअर १० हजार रुपये कोलकाताच्या कंपनीने घेतले, तर १०० कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असं सोमय्या म्हणाले. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, असं सोमय्या म्हणाले.

सोमय्या पुढे म्हणाले की, १ रुपया शेअर कोलकात्यातील कंपनीला ५०० रुपयाला विकला. या घोटाळ्यात आयएएस अधिकारीही लिप्त आहेत. यात १५ कोटींचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा. लि. कंपनीने केलाय. २० ऑक्टोबर २०१२ रोजी कंपनी स्थापन झाली आणि ३० ऑक्टोबर २०१२ रोजी १५ कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे सर्व उदय शंकर महावरच्या मदतीने झालं. उदय शंकर महावर हा गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

ही कंपनी २०२० मध्ये काही लाखात जाधव कुटुंबाच्या नावावर झाली. यात १०० कोटी रुपयांचा अपहार झालाय. घाटकोपर, हिंदमाता इथल्या नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली असा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय. यात ५०० कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे गेले, यामागे उदय शंकर महाराव हे सूत्रधार होते. तीन एजन्सींकडून या अपहाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केलीय.

सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी केलाय. आम्हाला मातोश्रीहून माहिती येते. सात दिवसांत कारवाई केली नाही तर पाहा काय होणार, असं हेमंत नगराळे यांना सांगण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button