राजकारण

सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाला महिलेकडून चोप !

विरार : विरार पूर्वेतील साईनाथ नगर इथं असलेल्या शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं चपलेनं चांगलंच चोपलंय. जितू खाडे असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चपलेनं चोपलं आहे. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याच कारणानं संतप्त महिलेनं जितू खाडे याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनंच चोप दिलाय. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेनं चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जातोय.

आयटम चाहीये?, असं म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते, असं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे हा सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या त्याचा शोध घेतला जात असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

खाडेनं फोन कॉलवरून सेक्ससाठी महिलांची मागणी केल्याचा आरोप महिलेनं केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या आरोपी खाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गेल्या १८-१९ वर्षांपासून विरारमध्ये राहते. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करते. मात्र असा प्रकार आतापर्यंत कधीच घडला नव्हता, असं रिक्षा पीडित महिलेनं सांगितलं. मी जितू खाडे ८-१० वर्षांपासून ओळखते. अचानक त्यानं मला ४-५ कॉल केले. माझ्याशी अतिशय घाणेरड्या भाषेत बोलला. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केला. माझ्यासोबत घडलेला प्रकार दुसऱ्या महिलांसोबत घडू नये, असं महिलेनं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button