Top Newsराजकारण

शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार? संजय राऊत घेणार प्रियंका गांधींची भेट

यालाच डबल ढोलकी म्हणतात, चंद्रकांत पाटलांचा निशाणा

नवी दिल्ली: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रयोगाद्वारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन केली. शिवसेना यासाठी २०१९ मध्ये एनडीएतून बाहेर पडली. २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची माहिती आहे. संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटणार आहेत. राऊत उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर. बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेतील.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी यूपीएवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी यूपीए आणि काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालवायचं असल्यासं काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं होतं. यानिमित्तानं शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक दिसून आली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत उद्या राहुल गांधी आणि बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्यानं शिवसेना यूपीएमध्ये मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती आहे.

यालाच डबल ढोलकी म्हणतात, चंद्रकांत पाटलांचा निशाणा

शिवसेना खासदार दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गाधी यांची भेट घेणार आहेत. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पाठ वळल्यावर पुन्हा काँग्रेसशी जवळीक करणे याला डबल ढोलकी म्हणतात असा खोचक टोला पाटील यांनी राऊतांवर लगावला आहे. नार्वेकरांनी केलेल ट्विट हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणारे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये कोणताही नगरसेवक नाराज नसल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांना संजय राऊत युपीएमध्ये जातील का? संजय राऊतांच्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. यावर पाटील म्हणाले की, याला डबल ढोलकी असे म्हणतात, ममता बॅनर्जी आले की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर मिसळायचा यालाच डबल ढोलकी म्हणतात. सामन्य माणूस सुद्धा याला डबल भूमिका कधी घेत नाहीत असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

नार्वेकरांवर चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी पतानातील आठवणी जागवल्या आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी बलिदान दिलं त्यांना कोटी कोटी नमन असे नार्वेकर यांनी ट्विट केलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकरांनी हे ट्विट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन यावर तो मिनार उभा आहे. त्यांचे मातोश्रीच भांडण झालं आहे का कळत नाही. कारण असं ट्विट करणं त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button