राजकारण

तो मी नव्हेच! आणखी एक किरण गोसावी प्रकटला !

नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा खोटा ठरणार?

मुंबई : नवाब मलिक यांनी भाजप नेत्याच्या पत्नीची किरण गोसावीसोबत एका कंपनीत भागीदारी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाण्यातील एक किरण गोसावी उपस्थित होते. माझं नाव किरण गोसावी आहे. माझ्या नावातील साम्यामुळे सर्व घोळ झाला आहे. माझीही चौकशी करण्यात आली. मी पोलिसांना सर्व पुरावे दिले आहेत, असं गोसावी यांनी सांगितलं.

भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीची किरण गोसावीच्या कंपनीत पार्टनरशीप असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. मात्र मलिक यांचा हा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे. ठाण्यातील एका किरण गोसावीने भाजप नेत्याच्या पत्नीसोबत एका कंपनीत माझी पार्टनरशीप आहे. पण तो किरण गोसावी मी नव्हेच, असा दावा या किरण गोसावीने केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

यावेळी निरंजन डावखरे यांनीही या प्रकरणावर खुलासा करत मलिक यांच्यावर टीका केली. माझी पत्नी आणि किरण गोसावी हे पार्टनर आहेत, असं राष्ट्रवादीच्या लोकांनी पसरवलं. कोणतीही माहिती न घेता बोललं की कसं तोंडावर पडतो हे आता त्यांना कळलं असेल. आर्यन खानच्या माध्यमातून हे लोक स्वत:चे पर्सनल अजेंडे राबवत आहेत. निलिमा डावखरे आणि किरण गोसावी हे डायरेक्टर आहेत असं पसरवलं गेलं. पण आता जे माझ्या बाजुला बसलेत ते किरण गोसावी आहेत. किरण गोसावी नावाचे दोन व्यक्ती आहेत. त्या किरण गोसावीशी आमचा कोणताही संबंध नाही. काहीतरी सुपर स्पेशल बातमी करायची म्हणून भाजपच्या विरोधात काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, असं निरंजन डावखरे म्हणाले.

मित्र परिवारानं आपल्याला दिलेला गांजा पिऊन बोलल्यावर हीच अवस्था होते. माझ्याबद्दल, माझ्या पत्नीबद्दल आणि भाजपविरोधात चुकीच्या बातम्या पसरावल्या गेल्या. काल याबाबतची सगळी शहानिशा करण्यासाठी पुणे पोलिस आले होते. नवाब मलिकांनी हे खूप हुशारीनं घडवून आणलं. भाजपच्या विरोधात हे सगळ रचल गेलं. दीड महिन्यात अधिवेशन होत आहे. त्यात नवाब मलिक आतापासूनच हे अधिवेशन गाजणार असं बोलत आहेत. याचा अर्थ की येत्या अधिवेशनात शेतकरी आणि राज्यातील जनतेचे प्रश्न बाजुला टाकले जातील, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button