राजकारण

उद्धव ठाकरे अजूनही गप्प का? : देवेंद्र फडणवीस

मुंबई : अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावं लागेल, असे ते म्हणाले. हा राजीनामा झाला असला तरी जूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीत. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवतेय. ते म्हणाले होते, की वाझे काय लादेन आहे का?, त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अजूनही मुख्यमंंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं. त्यांनी चूक सुधारु असं सांगणं अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले.

नैतिकता आधीच आठवायला हवी होती. मात्र, नैतिकता कधीजरी आठवली तरी त्यांच स्वागतच केलं पाहीजे, असंही फडणवीस म्हणाले. जेव्हा एखाद्या सिटींग गृहमंत्र्यावर चौकशी होत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही. देशमुख यांच्याकडे राजीमाना देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का हा प्रश्न विचारावा लागेल. याचं कारण म्हणजे, ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तसेच आधी पोलिसांचा जो व्यवहार दिसतोय, त्याकडे पाहूनच सीबीआयने देशमुखांचे प्रकरण हे सीबीआयकडे दिले आहे.

देशमुखांच्या प्रकरणात सरकारचा पूर्ण बचाव फोल ठरला आहे. मी अतिरंजित बोलत नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी कायद्याच्या पदवीधर असल्यामुळे मी योग्य तेच बोलतो. या पूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका पाहिली तर मी पूर्ण कायद्याचा आधार घेऊन बोलत होते. मला उत्तर देणारे मला टोलवाटोलवीचे उत्तरं देत होते. मी पुराव्यासहीत ज्या गोष्टी मांडत होते, त्या सर्व कोर्टाने स्वीकारल्या आहेत. याचं मला समाधान आहे.

देशमुखांची विनाकारण पाठराखण करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्याकडे जाणार. त्यानंतर आता सरकारमधील तीन पक्ष गृहमंत्रिपद कोणाकडे द्यायचं ते ठऱवतील. जर गृहमंत्रिपदाचा भार सोपण्यात उशीर केला गेला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अडचणीची ठरु शकते.

मी आधीच म्हणालो होतो की, हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये. हे बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार आहे. दीड वर्षानंतर त्याचा अनुभव आता जनता घेत आहे. या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्याऐवजी सगळेच स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. हे सरकार तीन पायाचं असून ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत, त्याचा त्रास येथील जनता भोगत आहे. अनिल देशमुख वसुलीचे टार्गेट प्रकरणात अनेक नावं समोर येतील. आगामी काळात पुराव्यासहित अनेक गोष्टी बाहेर येतील. त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असेही फडणवीस म्हणाले

संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. त्यामुळे ते मला काही माहिती नाही, मला काही सांगता येणार नाही, अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button