आरोग्य

चीनच्या सिनोफार्म लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

शांघाय : जागतिक व्यापार संघटने (WHO) नं चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सिनोफार्म ही चीनची पहिलीच कोरोना लस आहे आहे ज्याला या प्रकारची मंजुरी मिळाली आहे. या लसीचा वापर या आधीच जवळपास ४२ देशांत केला जात असून लाखो जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे.

सिनोफार्म ही गैर-पाश्चिमात्य असणारी पहिलीच लस आहे की ज्याच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यायची का नाही यासाठी जागतिक आरोग्य संघनटेने एक समिती स्थापन केली होती. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून जगभरात गरीब देशांत कोरोनाचे लसीकरण करण्यात येत आहे. चीनच्या सिनोफार्म या लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर आता या लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे. यामुळे लाखो लोकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या आधी WHO ने फायझर आणि बायोएनटेकने बनवलेल्या लसीसोबतच अॅस्ट्राझेनेका, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन तसेच मॉडर्नाने उत्पादित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. सिनोफार्म ही जगातील सहावी लस आहे ज्याच्या आपत्कालीन वापराला WHO ने मंजुरी दिली आहे.

चीनची सिनोफार्म ही लस आतापर्यंत जगएभरातील ४२ देशांमध्ये वापरण्यात आली आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान अनेक देशांसमोर आहे. जगभरातील अनेक देशांत लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवायचा असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. अशा वेळी चीनच्या सिनोफार्मच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्याने हा प्रश्न काहीसा सुटणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button