नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज खंडित होणार; उद्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई: नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत २५ मे २०२१ रोजी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या क्षेत्रातही पाणीपुरवठा होणार नाही. २५ मे ०२१ च्या संध्याकाळपासून पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील दुरुस्तीची कामे होणार आहेत. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असा सूचनाही नवी मुंबई महापालिकेकडून देण्यात आल्यात. महापालिकेला सहकार्य करावं, असं आवाहनही करण्यात आले आहे.
मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे कामे आज हाती घेण्यात येणार असून, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत २५ मे २०२१ रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही, याची नोंद द्यावी, असंही नवी मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
या कालावधीत महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे आणि खारघर नोडमधील नवी मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे. तसेच बुधवार २६ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असंही नवी मुंबई महापालिकेनं सांगितलंय. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहेत.




