जागतिक महिला दिनी राष्ट्रीय स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन
भारती विद्यापीठाचा पुढाकार, देशभरातील 190 महाविदयालयांचा सहभाग
मुंबई – जागाितक महिला दिनानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, सांगलीच्यावतीने 8 मार्च 2021 रोजी एका अनोख्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन डिजीटल व्यासपीठावर महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते तर राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर, मध्यप्रदेशच्या विधी विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉ. दिव्या चंसोरीया यांच्या हस्ते समारोप करण्यात येणार आहे. अशी माहिती न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर यांनी दिली आहे.
स्पर्धेचा विषय डिस्क्रीएशन अॅड डीरोगेशन ऑफ वूमन डीग्निटी इन मस्क्यूलाईन मिडीया अॅड हीडन अजेंडा ऑफ पॅट्रिआर्ची असा आहे.
छोटया पडद्यावरील तसेच प्रसार माध्यमांमध्ये सादर केली जाणारी स्त्रीची साचेबंद प्रतिमा ही आजही पारंपरिक लिंगभेदावर आधारीत पुरुष प्रधान संस्कृतीची प्रतिक आहे. या स्त्री प्रतिमेच्या विकृतीकरणामुळे स्त्रीयांविषयी समाजमनावर चूकीच्या कल्पना बिंबवल्या जातात. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे केल्या जाणाºया स्त्रीयांच्या शोषणाला वाचा फोडण्यासाठी या सर्वच विषयांवर सखोल विचारांची आवश्यकता लक्षात घेउन या विषयावर विद्यार्थ्याकडून टीकात्मक परीक्षण व्हावे, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी 10 हजार रुपयांची रोख पारितोषिके आणि सहभागी सर्वांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू अशा अनेक राज्यातील सुमारे 190 महाविद्यालये, लॉ कॉलेजनी सहभाग नोंदवलेला आहे.