Uncategorized

कंगनाविरोधात कोर्टाचे अटक वॉरंट

मुंबई : जावेद अख्तर यांची बदनामी प्रकरणात बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. कंगनाला अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून आता जामीन वॉरंट बजावण्यात आला आहे. कंगनाला जावेद अख्तर बदनामी प्रकरणात हजर राहण्यासाठी न्यायालयाने सोमवारची मुदत दिली होती. पण आजच्या सुनावणीला कंगना हजर राहू शकली नाही. जावेद अख्तर यांनी कंगनाने त्यांची बदनामी केल्याप्रकरणात कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात सुनावणीसाठी कंगनाला हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. पण कंगनाने वारंवार या सुनावणीसाठी गैरहजर राहिली आहे. म्हणूनच कोर्टाने कंगनाविरोधात या प्रकरणात अटक वॉरंट बजावला आहे.

कंगना मुंबई दाखल झाल्यावर लगेचच कंगनाला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आता तयारी करण्यात आली आहे. कंगना सध्या हिमाचलमध्ये असल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. कंगना ज्या क्षणी मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल, त्याच क्षणी कंगनाला अटक करण्यात येईल असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याआधी कंगनाला कोर्टाकडून हजर राहण्यासाठी तीन ते चार वेळा समन्स बजावण्यात आला आहे असे कळते. या संपुर्ण प्रकरणात कंगनावर अटकेची कारवाई करण्याची जबाबदारी ही जुहू पोलिसांची आहे. याआधी १ फेब्रुवारीला कंगनाला समन्स बजावण्यात आला होता. त्यामध्ये १ मार्चआधी कंगनाला हजर राहण्याचे आदेश मेट्रोपॉलिटन कोर्टामार्फत देण्यात आले होते. या प्रकरणात पुढील सुनावणी ही २२ मार्चला होणार आहे. गेल्याच महिन्यात मुंबई पोलिसांनी जावेद अख्तर प्रकरणात एक अहवाल कोर्टाला सादर केला होता. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेत संपुर्ण प्रकरणात आपल्यावर निराधार असे आरोप होत असल्याचे जावेद अख्तर यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button