
शेअर बाजाराचे साम्राज्य
मागील आठवड्याची सुरुवात मंदीने झाली. सुरु झालेली ही घसरण गुरुवारपर्यंत कायम राहिली. शुक्रवारी मात्र निर्देशांकानी पुन्हा उसळी घेत बाउन्स बॅक केला. मागील आठवड्यात “नजारा टेक्नोलॉजी लिमिटेड” या बहुचर्चित आय.पी.ओ च्या माध्यमातून खुल्या भागविक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली. या सुरुवातीच्या सार्वजनिक भागविक्रीला सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्याकडून प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. “नजारा टेक्नोलॉजी लिमिटेड” चा हा आय.पी.ओ शेवटच्या दिवसाअखेर तब्बल 175 पट भरला गेलेला आहे.
शेअर बाजारात मागील आठवड्यात आयईएक्स, अदानी पॉवर, जेएसडब्लू स्टील, मेघमणी यांनी चमकदार कामगिरी केली. सद्यस्थितीला अल्पमुदतीचा विचार करता अबान, डीसीएम श्रीराम, पीडीलाईट इंडस्ट्रीज यासह अनेक शेअर्सची दिशा ही अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी तेजीची आहे. मागील आठवड्यानंतर अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची दिशा ही रेंज बाउंड झालेली असून निर्देशांकाची गती मात्र मंदीची झालेली आहे.
अल्पमुदतीसाठी निर्देशांक सेन्सेक्सची 48580 आणि निफ्टीची 14350 ही महत्वाची आधार पातळी आहे. शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवूनच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक सेन्सेक्स 52520 ते 48890 आणि निफ्टी 15450 ते 14450 इतक्या मोठ्या रेंज मध्ये अडकलेला आहे.
अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक हे यापूर्वीच मंदीत आलेले असून जोपर्यंत सेन्सेक्सने 50900 आणि निफ्टीने 14900 या पातळ्यांच्या खाली आहेत तोपर्यंत शेअर बाजारात मोठी तेजी येणार नाही. त्यामुळे शेअर बाजारात सध्या नवीन खरेदी टाळणे हिताचे ठरेल. कमोडीटी मार्केटचा विचार करीता सोने या धातूची दिशा ही मध्यम मुदतीसाठी मंदीची असून सोने या धातूची 47000 ही अत्यंत महत्वाची पातळी असून जोपर्यंत सोने बंद पद्धतीने ही पातळी तोडत नाही तोपर्यंत सोन्यामध्ये मोठी वाढ होणार नाही. एकूणच पुढील आठवड्यासाठी “वेट अँड वॉच” ……
EMAIL ID – samrajyainvestments@gmail.com
WEB – www.samrajyainvestments.com
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)