वी ची डिस्ने+ हॉटस्टार सोबत भागीदारी
मुंबई : भारतातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने भारतातील आघाडीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक डिस्ने+ हॉटस्टारसोबत भागीदारी केली आहे. आपल्या ग्राहकांना उच्च दर्जाचे मनोरंजन आणि संपूर्ण वर्षभर क्रिकेटचा मनमुराद आनंद मिळवता यावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या भागीदारीमुळे भारतीयांना मनोरंजन आणि क्रिकेट या दोन सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांतील सर्वोत्तम व्हिडिओ कन्टेन्ट पाहायला मिळणार आहे.
कंपनीने सुरु केलेल्या नवीन पॅक्ससोबत वी ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व मनोरंजनाचा लाभ मिळवता येईल. यामध्ये तब्बल १२ महिने नॉन-स्टॉप क्रिकेटपासून हिंदी व तमिळमधील नवे, लोकप्रिय सिनेमे (अजय देवगणचा भुज: द प्राईड ऑफ इंडिया, अभिषेक बच्चनचा द बिग बुल, आर्यज टेडी), हिंदी, तमिळ व तेलुगूमध्ये डब करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय सिनेमे व शोज, मार्व्हलचे सुपर हिरो चित्रपण व शोज (द फाल्कन अँड द विंटर सोल्जर, एवेन्जर्स: एन्डगेम, आयर्न मॅन ३), नवे ऍनिमेशन सिनेमे (द लायन किंग, फ्रोझन २), मुलांचे लोकप्रिय शोज (डोरेमॉन, शिनचान), एक्सक्लुसिव्ह हॉटस्टार स्पेशल्स (थेट प्रक्षेपण, ओके कम्प्युटर, स्पेशल ऑप्स १.५, आर्या सिझन २, क्रिमिनल जस्टीस: बिहाईंड क्लोज्ड डोअर्स), खेळांचे थेट प्रक्षेपण आणि अजून भरपूर मनोरंजनापर्यंत सर्व काही आहे.
डिस्ने+ हॉटस्टारसोबत भागीदारीबद्दल वी चे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले, “भारतात क्रिकेट हा धर्म आहे. प्रत्येक स्तरातील, प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला क्रिकेटबद्दल आत्यंतिक प्रेम वाटत असते. सहयोगातून नवनवीन गोष्टी सादर करण्याच्या आमच्या कन्टेन्ट धोरणाला अनुसरून डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सोबत भागीदारीची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना संपूर्ण वर्षभर क्रिकेटचा मनोसोक्त आनंद मिळत राहील आणि त्यासोबत डिस्ने+हॉटस्टारचे सर्वोत्तम मनोरंजन हॉटस्टार स्पेशल्स, हॉटस्टार मल्टिप्लेक्स व सर्व विदेशी सिनेमे व शोज हे देखील बघायला मिळतील. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व वी ग्राहकांना वी गिगानेट – भारतातील सर्वात वेगवान ४जी नेटवर्कवर सर्वोत्तम क्रिकेटिंग ऍक्शन बघता यावी हा आमचा उद्देश आहे.”
डिस्ने+हॉटस्टारचे ईव्हीपी प्रभ सिमरन सिंग यांनी सांगितले, “प्रत्येक भारतीयाला जगातील सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद मिळवता यावा हा आमचा सिद्धांत आहे आणि देशभरातील वी युजर्सना डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपीचा आनंद मिळावा यासाठी वी सोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यावर्षी क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाच्या मॅचेस होणार आहेत, सोबत डिस्ने+हॉटस्टारचे उच्च दर्जाच्या प्रभावी कार्यक्रमांची रेलचेल आहेच, संख्येने खूप जास्त असलेल्या, वी ग्राहकांना संपूर्ण वर्षभर हे मनोरंजन देता येणार आहे ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. देशात व्हिडिओ सब्स्क्रिप्शन उद्योगात आघाडी मिळवण्याच्या दिशेने डिस्ने+हॉटस्टारने हे अजून एक मोठे पाऊल उचलले आहे.”
वी प्रीपेड युजर्ससाठी: वी ३ नवे अनलिमिटेड रिचार्ज प्लॅन्स + १ डेटा ओन्ली प्लॅन सादर करत आहे. यामध्ये १ वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन देखील मिळणार आहे. सर्व नवीन आणि आधीपासूनच्या ग्राहकांना रिचार्जेससोबत या ऑफरचा लाभ घेता येईल. ही ऑफर १० मार्च २०२१ पासून सुरु होत आहे.
४०१ रुपये; वैधता २८ दिवस | ६०१ रुपये; वैधता ५६ दिवस | ८०१ रुपये; वैधता ८४ दिवस | ५०१ रुपये; वैधता ५६ दिवस |
ऑफर:
· १ वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन · १०० जीबी ४ जी डेटा (दर दिवशी ३ जीबी + १६ जीबी अतिरिक्त) · अमर्याद कॉल्स |
ऑफर:
· १ वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन · २०० जीबी ४ जी डेटा (दर दिवशी ३ जीबी + ३२ जीबी अतिरिक्त) · अमर्याद कॉल्स |
ऑफर:
· १ वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन · ३०० जीबी ४ जी डेटा (दर दिवशी ३ जीबी + ४८ जीबी अतिरिक्त) · अमर्याद कॉल्स |
ऑफर:
· १ वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन · ७५ जीबी ४ जी डेटा |
वी पोस्टपेड युजर्ससाठी: सध्याच्या प्लॅन्सवर इतर सर्व लाभांसहित १वर्षाची डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी सब्स्क्रिप्शन आणि ४९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्तीच्या रेंटल्ससह अतिशय आकर्षक प्लॅन्स. सध्या ज्यांचे इतर प्लॅन्स आहेत ते वी ग्राहक देखील यापैकी कोणत्याही प्लॅनमध्ये येऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
पोस्टपेड ऑफर्स | एंटरटेनमेंट+४९९ | एंटरटेनमेंट+६९९ | रेडएक्स |
अनलिमिटेड व्हॉईस | हो | हो | हो |
डेटा | ७५ जीबी | अनलिमिटेड | अनलिमिटेड |
डेटा रोल-ओव्हर | २००जीबी | – | – |
डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी | हो | हो | हो |
ऍमेझॉन प्राईम | हो | हो | हो |
वी मुव्हीज अँड टीव्ही – व्हीआयपी ऍक्सेस | हो | हो | हो |
नेटफ्लिक्स | – | – | हो |
एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस (दर वर्षी ३ डोमेस्टिक आणि १ इंटरनॅशनल) | – | – | हो |
इंटरनॅशन रोमिंग पॅक ७ दिवसांसाठी – दर वर्षी २९९९ रुपये किमतीचा | –
|
– | हो |