स्पोर्ट्स
विराट कोहली आयपीएलनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचंही कर्णधारपद सोडणार
मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली यानं सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नुकतंच कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचीही घोषणा केली होती.
यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा खेळाडू म्हणून मी खेळत राहणार आहे. माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत मी आरसीबीसाठी खेळत राहीन. आजवर माझ्यावर ठेवलेल्या विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो, असं कोहलीनं म्हटलं आहे. कोहलीचा एक व्हिडिओ आरसीबीच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.