विनोद तावडे चंदीगढ महापालिकेसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी
मुंबई : भाजप नेते विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम ठेवल्यानंतर भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर आणखी एक अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. आगामी चंदीगढ महापालिका निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडेंना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. विनोद तावडे सध्या हरियाणा निवडणूक प्रभारी देखील आहेत. परंतु शेतकरी आंदोन, कृषी कायदा, आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची जबाबदारी असेल. शुक्रवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी विनोद तावडेंनी नियुक्ती केली आहे. तसेच भाजपकडून तावडेंसह भाजप राज्य सभा सदस्य इंदु बाला गोस्वामी यांनाही सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
भाजप नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपकडून कायम ठेवण्यात आलं आहे. चंदीगढमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. परंतु पंजाब, हरियाणा, चंदीगढच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शेतकरी आंदोलन, कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका महत्त्वाच्या असतील यामुळे विनोद तावडेंकडे एक महत्त्वाची जबबादारी आहे.
चंदीगढ महापालिकेच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या अखेरिस होणार आहेत. चंदीगढमध्ये ३५ जागांवर डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहे. प्रभारी विनोद तावडे यांच्या निगराणीखाली निवडणुका लढवण्यात येतील. विनोद तावडे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली आहे. विनोद तावडेंच्या अनुभवाचा चांगला फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.