जयपूर : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा लग्नसोहळा अखेर पार पडला आहे. राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. २०२१ मधील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असा हा लग्नसोहळा ठरला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाविषयी अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर विकी-कतरिनाची जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
विकी आणि कतरिनाने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. राजेशाही थाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये कतरिनाने डार्क गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात विकीने रॉयल एन्ट्री घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, विकीने एका विंटेज कारमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीला मोठ्याने ढोलताशांचा गजर करण्यात आला होता.
दरम्यान, या लग्नसोहळ्याची गेल्या आठवड्याभरापासून चर्चा होती. अखेर हा विवाह सोहळा संपन्न झाला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे या लग्नात विकी-कतरिनाने पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं सांगण्यात येतं. या जोडीने जेवणाच्या मेन्यू पासून ते पाहुण्यांच्या राहण्याच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं होतं.
सोशल मीडियावर कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले. या फोटोला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी कमेंट्स करून विकी आणि कतरिनाला शुभेच्छा दिल्या.
आलिया आणि प्रियंकाच्या कमेंट्स
कतरिना आणि विकीच्या फोटोवर आलिया भटने कमेंट केली, ‘तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात.’, तर प्रियांका चोप्राने कमेंट केली, ‘आज मेरी यार की शादी है, दोघांना शुभेच्छा ‘. प्रियांका आणि आलियासोबतच दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीति चोप्रा या सेलिब्रिटींनी देखील विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.
करिनाच्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले
कतरिनाने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, ‘प्रेमाची ताकद, तुम्हा दोघांना शुभेच्छा’. तर कतरिनाच्या फोटोला करिनाने कमेंट केली, ‘You did it’