Uncategorized

लखीमपूर खिरी प्रकरणावरून वरूण गांधींचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

कानपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राला अटक केल्यामुळे येथील आंदोलकांचा संताप काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, भाजप नेते वरुण गांधी यांनी या प्रकरणावरुन गंभीर आरोप केला आहे.

वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचे नावही हटवले आहे. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे. खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांसोबतची भूमिका कायम ठेवली आहे. लखीमपूर खेरी घटनेवरुन ते सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत.

वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन लखीमपूर खेरी येथील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. लखीमपूर खेरी प्रकरणातून हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे विधान अनैतिक किंवा खोटं आहे असे नाही. एका पिढीला बरं करण्यासाठी लागलेल्या जखमा पुन्हा ताज्या करणं, तसेच दोष-रेषा निर्माण करणं हे धोकादायक आहे, असे वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्या क्षुल्लक राजकीय लाभासाठी राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवू नये, असेही वरुण यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button