विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा बघूनच बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घ्या : वर्षा गायकवाड
मुंबई: सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. याबाबत राज्य सरकार मुंबई हायकोर्टात आपली बाजू मांडेल आणि कोर्टही सहानुभूतीनं निर्णय घेईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका केंद्र सरकारकडे मांडली आहे, असेही त्यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत गायकवाड यांनी सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी आपली भूमिका असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट क करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत मांडली.
उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीनं निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्यात, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.