केंद्रीय कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहेरबान; महागाई भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ

नवी दिल्लीः कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्ता (व्हेरिएबल डिअरनेस ऑलौन्स) दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचार्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा १०५ रुपये होता, तो दरमहा वाढवून २१० रुपये करण्यात आलाय. नवीन व्हेरिएबल महागाई भत्ता १ एप्रिल २०२१ पासून लागू होईल. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारमधील कर्मचारी आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ होईल.
कामगार मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, खाणी, तेल फील्ड, बंदर कर्मचार्यांना होईल. कंत्राटी आणि प्रासंगिक कामगार दोघांनाही याचा फायदा होईल. मुख्य कामगार आयुक्त डीपीएस नेगी म्हणाले की, महागाई भत्त्यामध्ये दरमहा १०० टक्के वाढ केली. आता दरमहा १०५ रुपयांऐवजी २१० रुपये दरमहा मिळतील.
यावेळी संपूर्ण देश कोरोना संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या सर्व वेळापत्रकातील कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला. व्हेरिएबल महागाई भत्ता औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर निश्चित केला जातो.
महागाई भत्त्याला ग्रहण
कोरोनामुळे २०२० मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता स्थिर करण्यात आला. यंदा मार्च महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केले की, केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनाधारकांना महागाई सवलत (डीआर) १ जुलै २०२१ पासून परत देण्यात येईल. १ जुलैपासून वाढ केली, तर ६५ लाख निवृत्तीवेतनधारक आणि ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. महागाई भत्त्याचे तीन हप्ते १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ हे केंद्रीय कर्मचार्यांच्या खात्यात कधी येतील हे अद्यापही अस्पष्ट आहे.




