Top Newsआरोग्य

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण नोंदणीस प्रारंभ

मुंबई : केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी आजपासून (१ जानेवारी) १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन तसेच ऑनलाईन पद्धतीने मुलांच्या नावाची नोंदणी करता येते.

राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देश तिसऱ्या लाटेच्या छायेत असल्याने लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने मुभा दिलेली आहे. संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. तसेच कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात आजपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नावनोंदवणी सुरु झाली आहे. https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते. कोवीन या वेबसाईटवर गेल्यानंतर अ‍ॅड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button