Top Newsराजकारण

पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं, तर मी २०१९ मध्येच मागितलं असतं !

उत्पल पर्रिकरांचं देवेंद्र फडणवीसांना रोखठोक उत्तर

पणजी : केवळ मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं तर ते मी २०१९ मध्येच मागितलं असतं. भाजपचे अनेक कार्यकर्ते १९९४ पासून माझ्या वडिलांसोबत काम करत होते, ते आता माझ्यासोबत काम करत आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.

गोव्यात अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, तिकीट न मिळाल्यास उत्पल पर्रिकर बंडाचा झेंडा उचलण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपत तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो, असं विधान केलं होतं. त्याला आता उत्पल पर्रिकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उत्पल म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर बोलायचं नाही. मात्र केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं तर ते मी २०१९ मध्येच मागितलं असतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button