शिक्षण

गुणवत्तापूर्ण ऑनलाइन शिक्षणासाठी ‘अपग्रेड’ची अमृता युनिव्हर्सिटीशी भागीदारी

मुंबई : अपग्रेड या भारतातील सर्वात मोठ्या हायर एडटेक कंपनीने आज अमृता युनिव्हर्सिटी (विश्व विद्यापीठम) या संस्थेसह भागीदारी करीत असल्याची घोषणा केली. या वेळी ‘अपग्रेड’ने ‘बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (बीबीए) आणि ‘बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन्स’ (बीसीए) या दोन नवीन पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आपल्या ऑनलाइन शिक्षण पोर्टफोलिओमध्ये केला. या दोन्ही संस्थांमधील भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी, कोठेही, स्वस्तदरात गुणवत्तापूर्ण ऑनलाइन शिक्षणास प्रवेश घेता येईल.

अमृता विश्व विद्यापीठमला भारतातील चौथे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ हा दर्जा देण्यात आला आहे. ‘टीएचई २०२०’ जागतिक मानांकनानुसार, हे विद्यापीठ भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था बनू शकणारी व जागतिक शैक्षणिक नकाशावर भारताला नेऊ शकणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून भारत सरकारने या विद्यापीठाची निवड केली आहे. अपग्रेड व अमृता युनिव्हर्सिटी यांच्या भागीदारीतून सुरू होणाऱ्या ३ वर्षाच्या अंडरग्रॅज्युएट (यूजी) पदवी अभ्यासक्रमांमध्ये ७२० तासांची लाइव्ह सत्रे आणि ३२०० पेक्षा जास्त शैक्षणिक तास घेण्यात येतील. ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’मध्ये अनुक्रमे ४० व ३० हून अधिक विषयांचा अभ्यास घेतला जाईल. यातील विद्यार्थांना भारत आणि परदेशांतील उत्कृष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल. हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीबरोबरच इंटर्नशिप, प्रकल्प, ‘प्लेसमेंट’ साठीची मदत आणि ‘अमृता माजी विद्यार्थी’ हा दर्जा प्राप्त होईल.

अपग्रेडचे सह-संस्थापक फाल्गुन कोम्पल्ली म्हणाले, “आयबीईएफ’च्या आकडेवारीनुसार, ५ ते २४ वर्षे वयोगटातील ५० कोटी इतकी जगातील लोकसंख्या भारतात आहे. तथापि, यातील उच्च शिक्षण घेण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीस, विशेषत: दुर्गम किंवा ग्रामीण भागातील रहिवाश्यांना, संधी मिळतेच असे नाही. या प्रकारच्या चिंताजनक परिस्थितीमुळे, देशात कुशल कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. भारतातील दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण ऑनलाईन उच्च शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘अमृता विश्व विद्यापीठम’ शी भागीदारी केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. विशेषत: आमच्या विद्यार्थ्यांना सखोल शिक्षणाचा, समकालीन व असमकालीन अध्यापन पद्धतींच्या संयोजनाचा अनुभव मिळेल. विविध विषयांचे सखोल व अचूक ज्ञान मिळू शकेल, अशा रितीने या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यामुळे त्यांना इच्छित कारकीर्दीची उद्दिष्टे गाठण्यास मदत होईल.”

अमृता विश्व विद्यापीठम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू पी. वेंकट रंगन म्हणाले, “अमृता ऑनलाईन कार्यक्रम हे उद्योग क्षेत्रातील दिग्गज, प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानातील तज्ज्ञ यांच्या धोरणांनुसार बनविण्यात आलेले आहेत. प्रत्येक महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्याला किंवा व्यावसायिकाला यातून तात्काळ कौशल्यप्राप्ती आणि वास्तवातील जगाचा अनुभव यांची हमी मिळते. ‘अपग्रेड’शी झालेल्या भागीदारीमुळे भारतातील सर्व गावांमध्ये व शहरांमध्ये हे अभ्यासक्रम पोहोचविण्यास मदत होईल.”

‘अमृता’ने मायक्रोसॉफ्ट, सिस्को, अॅमेझॉन एडब्ल्यूएस आणि आयबीएम यांसारख्या कंपन्यांसह सहयोग केला आहे. आंतरराष्ट्रीय द्वि-पदवी अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि २००हून अधिक आंतरराष्ट्रीय भागीदारांद्वारे प्लेसमेंटच्या संधी, अशी ‘अमृता’च्या अभ्यासक्रमांची अनोखी वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांना आधार देण्याची अनोखी संधीदेखील भारतातील टॉप स्टार्ट-अप इनक्यूबेटर, ‘अमृता टीबीआय’ येथे मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button