केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तातडीनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच रमेश पोखरियाल यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरियाल यांना कोरोना होऊन केला आहे. तसेच कोरोना नंतरच्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसेच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज सामान्य स्वरुपात सुरु राहील असंही त्यांनी सांगितलं होतं.