राजकारण

उद्धव ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : सचिन वाझे आणि शिवसेनेचे नाते काय, असा प्रश्न उपथित करून आम्ही जगातील सर्व काही पाहिलं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रथमच पाहिलं. सचिन वाझेला झालेली अटक आणि परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंनी तत्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं म्हटलं. या घटनेने संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत

सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सांगतात की सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाही. त्याला प्रमाणपत्र देतात. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात एका सक्षम तपास अधिकाऱ्याला त्रास दिला जातोय. शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते. सचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र आलंय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितलं, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढलं जाऊ नये यासाठी २ कोटी मागितले. अनिल परब यांनी देखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून देखील २ कोटींच मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले, तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे”, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी शिवसेना आणि सचिन वाझे यांच्यात संबंंध काय आहे असा सवालही उपस्थित केला. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप्स सुद्धा प्ले करुन दाखवल्या. या क्लिप्समध्ये संजय राऊत हे सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं सागंत आहे तर सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे खरं तर हे महावसुली सरकार मागच्या दाराने आलेलं सरकार आहे. या सरकारकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. आम्ही जगातील सर्व काही पाहिलं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रथमच पाहिलं. ज्या व्यक्तीची गाडी होती त्याची हत्या करण्यात आली, असे जावडेकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button