राजकारण

महाराष्ट्रात दिवसाला ५० हजार रेमडेसिवीरची गरज असताना केंद्राने दिला २६ हजारांचा कोटा : मलिक

मुंबई : पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणावत असल्याने काळाबाजार सुरु आहे. यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारकडे रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवून देण्याची वारंवार मागणी करत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र यातील फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा राज्याला उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावर नवाब मलिक यांनी नाराजी दर्शवली आहे. एकीकडे राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा अपुरा पडत आहे. यात केंद्राने महाराष्ट्राला गरजेपेक्षा कमी इंजेक्शन साठा उपलब्ध करुन दिल्याने राज्यासमोरील कोरोना संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.

नवाब मलिक यांनी ”केंद्र सरकारने आम्हाला दररोज ५०००० इंजेक्शनचा पुरवठा करत राज्यातील रुग्णांची गरज भागवावी” अशी मागणी केली होती. परंतु केंद्राकडून दरदिवसा फक्त २६००० रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा होत असल्याने वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात आणखी नवे संकट निर्माण होईल अशी चिंता नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. मलिक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यांबाबतीच माहिती दिली आहे.

नुकतेच केंद्र सरकारने विविध राज्यांना पुरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन साठ्याची माहिती जाहीर केली. या माहितीचा हवाला देत नवाब मलिक म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील विविध राज्यांना पुरवठा केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आकडेवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रात वाढत्या आवश्यकतेनुसार ५०००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारकडून राज्याला दरदिवसा फक्त ३६००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button