Top Newsराजकारण

नवाब मलिकांकडून प्रभाकर साईलला टू बीएचके फ्लॅट आणि पैसे; फरार किरण गोसावीचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यातच किरण गोसावीने माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाला पुन्हा वेगळेच वळण दिलं आहे. आरोप करण्यासाठी प्रभाकरला २ बीएचके फ्लॅट नवाब मलिकांकडून मिळणार आहे. काही पैसेही देण्यात आले आहेत. पैशांचे व्यवहार सोलापूरमध्ये झाले असं गोसावीने म्हटलं आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं फरार आरोपी किरण गोसावी याला स्वतंत्र साक्षीदार बनवलं. त्यानंतर या संपूर्ण घटनेकडे सर्वांचे लक्ष गेले. आता किरण गोसावी याने माध्यमांना समोर येऊन मुलाखत दिली आहे. त्यात पुण्यातील जुन्या प्रकरणात आपल्याला सरेंडर व्हायचं आहे ज्यात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे असं सांगितले. एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना किरण गोसावीने धमक्या येत असल्याने मी फोन बंद केला होता असं सांगितलं

मला ३ ते ६ तारखेमध्ये धमक्यांचे फोन येत होते. तुला जिवंत ठेवणार नाही असं धमकावले गेले. त्यानंतर ६ तारखेने पुणे पोलिसांनी जुनं प्रकरण पुन्हा बाहेर काढलं. तेव्हा मी पुण्याला जात होतो परंतु मला वाटेत फोन आला. तू सरेंडर केले तरीही वाचणार नाही. तुला सोडणार नाही असा फोन आला. त्यामुळे पोलीस सरेंडर होऊनही फायदा नाही. त्यामुळे मी लपून राहिलो. ८ ते १० लोकांकडून मला फोन येत होते. तू आर्यनला अडकवलं असं म्हटलं. मी जे काही लिहून दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टात बोलेन. पुणे पोलिसांनी ४ वर्षापूर्वीची केस पुन्हा ओपन केली. मात्र त्याने फरक पडत नाही.

त्याचसोबत प्रभाकर साईलनं २५ कोटीबद्दल जे काही आरोप केलेत ते सत्य नाही. प्रभाकर साईलचं मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासावेत. जे आरोप त्याने केलेत त्याची शहानिशा करावी. प्रभाकरसोबत दोघं भाऊ होते. जे जबरदस्तीने व्हिडीओ शूट करत होते. त्यांच्याकडेही ऑफर आली होती असा दावा किरण गोसावीने केला आहे.

सेल्फी घेतल्यानंतर माझं नाव या प्रकरणात समोर आलं. त्यानंतर मला टॉर्चर करणारे फोन आले. जर तू साक्ष दिली तर हे करू तसं करू धमकावलं. काही ऑफरही देण्यात आल्या. जेव्हा मी पोलीस सरेंडर होणार होतो तेव्हा मी घाबरलो. मी सरेंडर करणार असल्याचं त्यांना समजलं. माझे कॉल रेकॉर्ड आणि फोन ट्रेस करावेत. मला फोन येत असल्याने स्विच ऑफ केला. मी महाराष्ट्रात होतो. त्यानंतर लखनऊला पोहचलो. आता महाराष्ट्रात जाऊ शकत नाही. त्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात सरेंडर करायचं होतं.

क्रुझ पार्टीवर अनेक मोठे लोक उपस्थित होते. नेक्ड डान्स, ड्रग्ज, गोळी सर्वकाही तिथे सुरू होते. मी एनसीबीला कॉल केला. त्यामुळेच मला धमकीचे फोन आले. मी तेव्हा लक्ष दिलं नाही. त्यानंतर पुण्यात सरेंडर होण्याचा प्रयत्न केला परंतु तिथून रिस्पॉन्स मिळाला नाही. या प्रकरणात अनेक लोक जोडले आहेत. १० कड्या उघडल्यात अजून ९० बाकी आहेत. समीर वानखेडे आणखी लोकांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतायेत. नवाब मलिक प्रभाकर साईलला पैसे देऊन पुढे करतायेत. समीर वानखेडे यांची चौकशी होत असेल तर आरोप करणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी.

मी कुणाचं नाव घेत नाही परंतु तपासात सर्वकाही उघड होईल. मी पुणे पोलिसांच्या स्वाधीन होईल, परंतु मला सुरक्षितपणे घेऊन जावं. मला ज्या केससाठी पकडलं आहे. त्या विभागानेच कारवाई करावी. मी मडियाओ पोलिसांना सरेंडर करेन. मी फिरू शकत नाही. माझं अपहरण होऊ शकतं. त्यानंतर माझ्या तोंडातून वेगळ्या गोष्टी बोलायला सांगू शकतात. मला मृत्यूचं भय नाही म्हणून सरेंडर होत आहे असंही किरण गोसावी म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button